विविध मागण्यासाठी संघटनांचे शनिवारपासून बंद आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विविध मागण्यांसाठी हमाल तोडणार आधी संघटनांच्या वतीने उद्यापासून बंद आंदोलन सुरू केला जाणार आहे सुरू केले. उद्या मार्केट येथील किराणा भुसार बाजार बंद ठेवण्यात येणार आहे सोमवारपासून फळे भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

आज (शुक्रवार ) मार्केटयार्ड येथील तोलणारांच्या प्रश्नांबाबत जेष्ठ कामगार नेते डाॅ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. डॉ आढाव यांनी” देशांतील प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहीजे अशी भाषणे केली जातात व एकीकडे महाराष्ट्र राज्यातील काही बाजारसमित्यांमधुन तोलणार कमी करायचे काम हे सरकार करीत आहे. हे सरकार कामगार, शेतकरी विरोधी आहे.

परस्पर निर्णय घेतले जात आहे. संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेतला गेला पाहिजे. निवडणुका होण्याअगोदर सर्व बाजार समित्या बंद पाडण्याचा हेतु या सरकारचा दिसत आहे. तसेच माथाडी कायदा देखील मोडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने होत असल्याचे चित्र दिसत आहे. “सदर प्रश्नांकरिता मार्ग निघाला नाहीतर जेलभरो करायचा, भुसार बाजार शनिवारपासून बंद ठेवण्याचा आणि त्यानंतर देखील सरकारने याची दखल घेतली नाहीतर फळे-भाजीपाला विभाग सोमवारपासुन बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.

शेतकरी वर्गांला हमीभाव मिळालाच पाहिजे,हमीफंडाची व्यवस्था केली पाहिजे,तोलाई सुरु ठेवावी अशा विविध मागण्या केल्या आहेत.
सदर सभेस कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे सचिव संतोष नांगरे खजिनदार विजय चोरघे, शशिकांत नांगरे तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे, किशोर भानुसगरे, दादा तुपे, राजेश मोहोळ, हनुमंत बहिरट, अंकुश हारपुडे, संपत सुकाळे व बहुसंख्येने कामगार उपस्थित होते. अशी माहिती कामगार युनियनच्या वतीने विशाल केकाणे यांनी कळविली.