दिवाळीच्या रात्री पतीनं पत्नीला लावलं ‘डावा’वर, मित्र जिंकला आणि पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील हजारीबागमध्ये आपल्या पत्नीलाच जुगारात लावणाऱ्या पतीची चांगलीच धुलाई करण्यात आली. दिवाळीच्या दिवशी देश दिवाळी साजरी करत असताना हा जुगारी पती जुगारामध्ये आपल्याला लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या महिलेने त्याठिकाणी जात पतीची यथेच्छ धुलाई केली. यामुळे बाकी जुगाऱ्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका बेवड्या पतीने सर्व पैसे जुगारात गमावल्यानंतर थेट आपल्या पत्निलाच जुगारामध्ये लावले. शेजारील गावातील एका तरुणाने हा डाव जिंकला. मात्र या महिलेला याची खबर मिळाल्यानंतर तिने त्या ठिकाणी जात आपल्या पतीची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे या पतीची सध्या गावभर चर्चा सुरु असून दिवाळीच्या दिवशी आपल्या पत्नीला जुगारात लावणाऱ्या या पतीची मोठ्या प्रमाणात निंदा होत आहे.

Visit : Policenama.com