वर्गणी न दिल्याने माताजी सुपर मार्केटची तोडफोड

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात वर्गणी देण्यावरून मंडळाच्या कार्यकर्त्यानी दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुकान मालक यांनी कार्यकर्त्यांच्या विरोधात निगडी पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी रात्री उशीरा घडली आहे. रमेश रुगाराम गेहते यांच्या मालकीचे दुकान आहे.

रमेश रुगाराम गेहते यांच्या मालकीचे निगडी यमुना नगर येथे माताजी सुपर मार्केट नावाचे दुकान आहे.ते गेल्या तीन महिन्यापासून त्या ठिकाणी चालवत असून खेताराम सरगरा हा मुलगा माताजी सुपर मार्केट चालवतो.

पुणे : पोलीस चौकित महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास स्थानिक गणेश मंडळाची काही कार्यकर्ते हे वर्गणी मागणीसाठी आले होते. त्यांना दोनशे रुपये वर्गणी दिली मात्र त्यांना दोन हजार एक रुपये वर्गणी हवी होती. ती देण्यास नकार दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यानी माताजी सुपर मार्केटच्या समोरील काउंटरचे दगडाने नुकसान करत काचा फोडल्या. याप्रकरणी निगडी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B07BCCFBKZ,B06Y93HZW1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ec3e232-ba6a-11e8-aeef-8f703ba4cd04′]