चाहत्यांची ‘डिमांड’ अखेर ऋषि कपूरकडून पूर्ण, शेअर केला ‘स्माइलिंग’ फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेते असून देखील ऋषी कपूर सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी अनेकदा संवाद साधत असतात. आपल्या नवीन नवीन पोस्टच्या माध्यमातून ऋषी कपूर सतत चर्चेत असतात. नाताळचे औचित्य साधत आणि आपल्या चाहत्यांसाठी ऋषी कपूरने एक स्माइलींग फोटो पोस्ट केला आहे.

ऋषि कपूरने शेअर केला कुटुंबासोबतचा फोटो
ऋषि कपूर आपल्या पूर्ण कुटुंबासोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ज्यामध्ये नीति कपूर, रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर दिसून येत आहे.

याआधी ऋषि कपूर सोशल मीडियावर संटाची टोपी घालत सर्व चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु या फोटोमध्ये ऋषि कपूर एकदम सिरिअस लूकमध्ये दिसून येत होते. त्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांना यावेळी आनंदात हसत रहा असे सांगितले होते. यानंतर चाहत्यांच्या या मागणीमुळे ऋषि कपूरने आपल्या कुटुंबासोबतच एक फोटो पोस्ट केला आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/