मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास आचारसंहिता भंगाची कारवाई : कामगार उपायुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – १७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांत २३ एप्रिल आणि २९ एप्रिल या दोन दिवशी मतदान पार पडणार आहे. त्यादिवशी कामगार, कर्मचारी, अधिकारी, व व्यवस्थापकांना निवडणुक आयोग व शासनाने भरपगारी सुट्टी जाहिर केलेली आहे. सर्व आस्थापना व कारखान्यांनी मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे. आयटी कंपन्यांनाही यासंदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत. असे कामगार उपायुक्त विकास पानवेलकर यांनी सांगितले.

१७ व्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूका सध्या पार पडत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. दरम्यान पुणे जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये २३ एप्रील व २९ एप्रील या दोन दिवशी मतदान पार पडणार आहे. दुकाने, हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या कामगार, कर्मचारी यांना मतदान करता यावे यासाठी त्यांना भरपगारी सुट्टी मतदानाच्या दिवशी निवडणुक आयोग व शासनाने भरपगारी सुटी जाहिर केलेली आहे. त्यामुळे आपले आस्थापनेत व कारखान्यातील सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याकरीता वेतनाासह सुट्टी देण्यात यावी.तर काही अत्यावश्यक सेवांमध्ये पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास निवडणुक निर्णय अधिकारी किंवा जिल्हधिकारी यांच्या पुर्वपरवानगीने मतदानाचा हक्क बजावण्याकरिता २ ते ३ तास सुटी देण्यात यावी. असे आदेश दिले आहेत.

सुट्टी न दिल्यास आचारसंहिता भंगाची कारवाई

मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत येणाऱ्या आस्थापना करिता निवडणुकीचे दिवशी सकाळी ७-०० ते सांयकाळी ६-०० या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याची अधिसुचना ३ एप्रिल जारी करण्यात आली आहे. तसेच याची माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनीही नोंद घ्यावी . हक्क बजावण्याकरीता कामगार व कर्मचारी यांना सुट्टी न दिल्यास निवडणुक आचारसंहितेच्या भंगाबाबत कारवाई होऊ शकते. असे कामगार उपायुक्त विकास पानवेलकर यांनी सांगितले.