किरकोळ वादातून डोक्यात लोखंडी पहार मारून पत्नीचा खून

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पती-पत्नीतील वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसन खूनात झाल्याचे खळबळजनक घटना साताऱ्यात घडली आहे. येथील माची पेठेतील शंकराचार्य मठाजवळ धनंजय दगडू खोत (५०) याने पत्नी वैशाली यांचा नारळ सोलण्याची लोखंडी पहार डोक्यात मारून खून केला. खुनानंतर धनंजय खोत याने रिक्षासह पळ काढला. त्याची रिक्षा चारभिंती परिसरात पोलिसांना सापडली तसेच रिक्षामध्ये रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी रिक्षा जप्त केली असून धनंजय खोतवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7e52a9b-d1f0-11e8-8ec8-1711ac74bf0f’]

वैशाली खोत (३८) या पती धनंजय दगडू खोत, सासू भार्गिर्थी, मुलगा विक्रांत, मुलगी सृष्टी यांच्याबरोबर राहत होत्या. तर धनंजय खोत हा रिक्षाचालक असून त्यास दारुचे व्यसन आहे. रिक्षा चालवून मिळालेले सर्व पैसे तो दारुत उडवत होता. यावरून दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत असत. दोन मुले असल्याने वैशाली यांनी घरात पिठाची गिरणी सुरु केली होती. पिठाची गिरणी तसेच फॉलपिकोची कामेही त्या करत. त्यातूनच त्यांचा घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत होता. धनंजयने वैशाली यांच्याकडे पैसे मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. वैशाली यांची मुलगी सृष्टी ही शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत असून तीला पुस्तके घेण्यासाठी ३०० रुपये हवे होते. हे पैसे तिने आई वैशाली यांच्याकडे मागितले.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5118fc30-d1f3-11e8-a80a-7d5594e4b52a’]

यावेळी वैशाली यांनी दिडशे रुपये सृष्टी हिला दिले. हे पैसे देत असतानाच वैशाली यांनी राहिलेले दिडशे रुपये वडील धनंजयकडून घेण्यास सांगितले. यानुसार सृष्टीने धनंजयकडे पैसे मागितले, मात्र त्याने ते देण्यास नकार देत पत्नीस शिवीगाळ केली. शिवीगाळ करत असतानाच धनंजयने पत्नी वैशाली हिला आज तुला दाखवतोच, अशी धमकी दिली. त्यानंतर सृष्टी कॉलेजला निघून गेली. १२ वीत शिकणारा विक्रांत हा सुध्दा कॉलेजला निघून गेला. दुपारी १ च्या सुमारास सृष्टी कॉलेजमधून घरी परतली. परंतु, घराच्या पुढील दारास कडी असल्याने आई आजूबाजूस कोठेतरी गेली असेल, असे तिला वाटल्याने तिने दाराची कडी काढली आणि ती आत आली. मात्र, स्वयंपाकघरात पाहिले असता तीला आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

मुंबई विद्यापीठाचा गजब कारभार गेल्या वर्षी 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं !

घाबरलेल्या सृष्टीने आरडोओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. काही नागरिकांनी घटनेची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यास कळवली. माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पोरे हे कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. वैशाली यांच्या डोक्यास पाठीमागील बाजूस गंभीर मार लागला होता. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेली नारळ सोलण्याची छोटी लोखंडी पहार सापडली. त्याच पहारीने डोक्यात वार करुन वैशाली यांचा खून केला. चौकशीत धनंजय खोत हा दुपारी घाईगडबडीत रिक्षा घेवून पसार झाल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी धनंजयचा शोध घेतला असता त्याची रिक्षा पोलिसांना चारभितींजवळ सापडली. या रिक्षात रक्ताचे डाग पडले होते. पोलिसांनी ती रिक्षा ताब्यात घेत अजिंक्यतारा किल्ला परिसर पिंजून काढत पळालेल्या धनंजयचा शोध सुरु केला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’237bf5dd-d1f1-11e8-a93c-6b917c7565cd’]

जाहीरात