‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेकडून मोफत कार्यक्रमाचे आयोजन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – 14 नोव्हेंबर या जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने रविवार दिनांक 24, नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गरवारे कॉलेजच्या सभागृहामध्ये सकाळी 9 वाजता आवर्जून उपस्थित राहून सर्वजण याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा शाखेने व्यक्त केली आहे. यावेळी उपस्थित लोक असोसिएशनच्या निरनिराळ्या सेवा आणि उपक्रमांचा लाभ घेऊ शकतात.

आपल्या उपस्थितीमुळे आमच्या या समाजोपयोगी कार्याला पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळणार आहे असं डॉ. भास्कर हर्षे (सहकार्यवाह डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखा) यांनी म्हटले आहे. मुख्य म्हणजे गरवारे कॉलेजच्या सभागृहात होणारा हा क्रार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. त्यामुळे सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात.

ही आहेत कार्यक्रमाची वैशिष्ट्ये-
– पहिल्या 200 रुग्णांची मोफत रक्तशर्करा तपासणी
– सवलतीच्या दरात HbA1c तपासणी
– काही नवीन आणि अत्यावश्यक तपासण्या(होल्टर, सीजीएमएस, स्लीप टेस्ट, एबीपीएम, पावलांकरिता व्हीपीटी टेस्ट, फंडस कॅमेरा टेस्ट इत्यादी) अत्यल्प दरात करण्यासाठी नाव नोंदणी
– आरोग्य व मधुमेहविषयक पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्री
– संस्थेची मेंबरशिप व मधुमेह मासिकाची वर्गणी सवलतीच्या दरात