शिरूर : कवी कुमोद रणदिवेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कवी कुमोद रणदिवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूरमध्ये(जि पुणे) राज्यस्तरीय काव्य संमेलन 2020 उत्साहात पार पडलं. या काव्यसंमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवींनी सहभाग घेतला होता. या संमेलनाचे अध्यक्ष श्रीरामपूर चे प्रसिद्ध कवी रज्जाक शेख व कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच संतोष राघू शिंदे यांनी केले.

तसेच या कार्यक्रमास चा ता बोरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. भैलूमे सर व क्रांती पैठणकर मॅडम, प्रा. बनकर सर, कवी मनोज दीक्षित, संदीप जाधव (सेक्रेटरी,जय भगवान कामगार संघटना ) या मान्यवरांच्या सामाजिक,राजकीय, शैक्षणिक कार्यासाठी सत्कार करण्यात आला.

प्रा. डॉ. भैलूमे सर ह्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “एक मैफिल कवितांची साहित्य मंचचा पुढील कार्यक्रम चा ता बोरा महाविद्यालयात संयुक्त विद्यामानाने होईल. या कविसंमेलनामार्फत देशातील तरुणांमध्ये क्रांती घडावी व देशातील तरुण जागृक व्हावा”आपल्या भाषणातून त्यांनी कवी महाबली मिसाळ (संडे स्पेशल फेम) व कवी कुमोद रणदिवे ह्यांचे कौतुक केले ,

या काव्यसंमेलनात राष्ट्रपती पदक प्राप्त कवी सीताराम नरके ह्यांनी ही आपली सुंदर रचना सादर केली. सर्व कवींनी आपल्या कवितेतून उपस्थितांची मने जिंकली. सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कवींना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व कवींनी आयोजक कवी महाबली मिसाळ व कवी कुमोद रणदिवे ह्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुनील जाधव (युवा सेना प्रमुख ,शिरूर शहर ) विनोद भालेराव (नगरसेवक) नितीन पाचर्णे (नगरसेवक) स्वप्नील रेड्डी ,महेंद्र येवले उपस्थित होते.याशिवाय या कार्यक्रमास सरपंच अशोक ईश्वरे, दादाभाऊ ईश्वरे, विजय जगताप,नितीन रणदिवे, किरण पवार, पवन रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार ठुबे यांनी केले तर कवी महाबली मिसाळ यांनी आभार मांडले.