ऑस्ट्रेलियाला पोहचताच ‘त्या’ दोघांमध्ये ‘काडीमोड’

गुरुदासपूर : पोलीसनामा ऑनलाइन – त्यांचे धुमधडाक्यात लग्न झाले. काही दिवसांनी ते ऑस्ट्रेलियात गेले. तेथे गेल्यावर तिने आपल्या पतीला मोठा धक्का देत सांगितले की, आता आपले संबंध संपले. लग्नानंतर दोन महिन्यात ती त्याच्यापासून वेगळी राहू लागली. इतकेच नाही तर तिने ऑस्ट्रेलियन पोलिसांकडे आपल्या पतीविरोधात तक्रारही केली. केवळ ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी तिने व तिच्या आईवडिलांनी ठरवून हे लग्न लावून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गुरुदारपूर पोलिसांनी युवती व तिच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भूपिंदरसिंह याचा विवाह धारीवाल येथे राहणारे गज्जनसिंह यांची मुलगी सिमरन कौर हिच्याबरोबर झाला. लग्नापूर्वी सिमरन कौर ही भूपिंदर सिंहबरोबर ऑस्ट्रेलियाला जाईल हे ठरले होते. लग्नानंतर काही दिवसांनी २२ लाख रुपये खर्च करुन दोघांना ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आले. परंतु, ऑस्ट्रेलियाला पोहचल्यानंतर दोनच महिन्यांनंतर सिमरन भूपिंदर सिंह बरोबर भांडणे करु लागली आणि त्याच्यापासून वेगळी राहू लागली. त्याबाबत भूपिंदर सिंह याने विचारल्यावर ऑस्ट्रेलियाला पोहचण्यासाठी केवळ आपण लग्न केल्याचे तिने सांगितले.

या सर्व प्रकाराचा भूपिंदरसिंह याला मोठा धक्का बसला. त्याने तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने पती आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार ऑस्ट्रेलिया पोलिसांकडे केली. त्यामुळे भूपिंदरसिंह चांगलाच अडचणीत आला. ऑस्ट्रेलियात त्याचे नातेवाईक असल्याने त्याला वेळेवर मदत मिळू शकली व अटक टळू शकली. या सर्व प्रकाराची माहिती इकडे भूपिंदरसिंह याच्या घरी मिळाली. तेव्हा त्यांनी गुरुदारपूर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या सर्व प्रकाराची चौकशी केल्यावर सिमरन व तिच्या आई वडिलांनी अगोदरच हे सर्व ठरवले होते.

भूपिंदर सिंहशी लग्न केल्यावर गज्जनसिंह ही ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल. ऑस्ट्रेलियाला गेल्यावर तिने लग्न मोडावे असे त्यांनी ठरविले होते. पोलिसांनी गज्जनसिंह, त्यांची पत्नी दविंदर कौर आणि सिमरन कौर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like