home page top 1

भर रस्त्यावर कारने घेतला पेट

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मानपाडा रोडवरुन पहाटे भरधाव जात असताना अचानक एका कारला आग लागली. कारला आग लागल्याचे दिसताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला थांबून त्यातून बाहेर पडल्याने कोणतीही जिवित हानी झाली नाही. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. अब्दुल खालिल खान हे एमएम टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीची कार घेऊन जात होते.

पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी ते मानपाडा येथील तिकुजिनीवाडी रोडवरील कॉसमॉस हेरिटेजजवळ आले असताना त्यांना कारच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने कार कडेला घेतली व त्यातून बाहेर पडले. तोपर्यंत कारने पेट घेतला होता. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यावर ते तातडीने घटनास्थळी पोहचले. परंतु तोपर्यंत संपूर्ण कारने पेट घेतला होता. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like