सोशल मिडियावर आलेल्या निगेटिव्ह कमेंट्सला जॅकलीन आणि कार्तिकने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नाडीसचे म्हणणे आहे की, ती एक संवेदनशील व्यक्ती आहे. त्याचबरोबर सोशल मिडियावर पोस्ट झालेले नकारात्मक कमेंट्स तिला प्रभावित करतात. कलर्स इन्फिनिटीच्या ‘बिएफएफ विद वोग-सीजन 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत जॅकलीनने याबाबत चर्चा केली आहे.

‘बिएफएफ विद वोग-सीजन 3’ मध्ये नेहा धुपियाने कार्तिकला विचारले की, तु कमेंट्स का वाचत असतो ? यावर कार्तिकने उत्तर दिले की, ‘हो’. पुन्हा नेहाने विचारले की, सोशल मिडियावर सगळ्या कमेंट चांगलेच असतात, असे नाही आणि ज्यावेळी तुम्ही कमेंट्स वाचता तेव्हा तुम्हाला कसे वाटते?

कार्तिकने यावर उत्तर दिले की, ‘माझ्यासाठी ९९ टक्के कमेंट्स चांगले असतात, पण १० मध्ये २ कमेंट्स निगेटिव्ह असतात.’ याचविषयाला धरुन जॅकलीन म्हणाली की, ‘इन्स्टाग्रामवर चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात पण त्यामधील कोणी जर काही बोलले तर मला वाटते की, याने असे का म्हणले असेल ?’

जेव्हा शोमध्ये नेहाने जॅकलीनला विचारले की, सगळ्या गोष्टींचा प्रभाव तुझ्यावर पडतो का? जॅकलीन म्हणाली की, ‘मी खुप संवेदनशील आहे. मला लगेच वाईट वाटते. माझ्यावर या गोष्टींचा लगेच प्रभाव पडतो. ‘

जॅकलीन सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिचे प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. जॅकलीनचे इन्स्टाग्रामवर २.८ करोड पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. त्याचबरोबर ट्विटवर तिचे १.३ करोड पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.