‘राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्तीची नियुक्ती का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीवर मोठा वादंग उठला आहे.

पोलिसांविरोधातील तक्रारींचा निपटरा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण असून त्याला सत्र न्यायालयाच्या समकक्ष अधिकारी आहे. संपूर्ण राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या या प्राधिकरणावरील नियुक्त्या खरे तर डोळ्यात तेल घालून व्हायला हव्यात. पण या प्राधिकरणावरच जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुण्यातल्या राजकुमार ढाकणे या व्यक्तीची नेमणूक करण्यात येत असेल, तर ते अतिशय गंभीर आहे असे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोण आहे राजकुमार ढाकणे ?

–  राजकुमार ढाकणेचा सिक्युरिटी पुरवण्याचा व्यवसाय

–  पुण्यातल्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने कामाचे पैसे मागितल्यावर त्याच्या डोक्यात लायसन्स रिव्हॉल्वरचा दस्ता मारून त्याला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी 2015 मध्ये गुन्हा दाखल असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

–  याच प्रकरणात ढाकणे अटक असताना ही पळून गेल्याचा दुसरा गुन्हा 2015 मध्ये दाखल

–  कोरेगाव पार्क पोलिसांकडून 2015 प्रतिबंधात्मक कारवाई

–  जागेत अतिक्रमण करुन कट करुन फसवणूक केल्याचा 2017 मध्ये गुन्हा

–  पुणे महापालिकेचे अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याचे दोन गुन्हे

–  2014 मध्ये फिनिक्स मॉलमध्ये बेकायदा घुसून दंगल माजवल्याचा विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा

–  रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर सदरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार