40 व्या वाढदिवशी 40 किलोमीटर स्केटिंग करणारे विनोद अहिरे ठरले भारतातील पहिलेच पोलीस

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विनोद पितांबर अहिरे यांचा (दि. 1 डिसेंबर) रोजी चाळिसावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांनी 40 किलोमीटर सेटिंग करून एक अनोखा विक्रम केला आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी 40 किलोमीटर स्कटिंग करून अहिरे यांनी देशातील पहिले पोलीस कर्मचारी असल्याचा बहुमान मिळवला आहे.

सकाळी 10 वाजता बहिणाबाई उद्यान येथे सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, नरेश बागडे, मुकुंद सपकाळे, फारुक शेख, प्रकाश बोरसे, विनोद देशमुख, प्रवीण पाटील, दिलीप सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

विनोद अहिरे म्हणाले की, समाजामध्ये पोलिसांबद्दल असा समज निर्माण झाला आहे की, पोलीस दलात भरती झाल्यावर पोलीस काही वर्षातच स्थूल होतात. त्यांचं पोट बाहेर येतं आणि त्यांच्याकडून धावले जात नाही, वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना जर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पोलिसांची प्रतिमा दाखवायचे असेल तर एक पोट सुटलेला पोलीस पाठीच्या कण्यातून वाकलेला पोलीस अशी प्रतिमा त्यांची दाखवली जाते या कल्पनेला छेद द्यावा म्हणून माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे आणि निवृत्तीपर्यंत दरवर्षी ते करत राहील.

अहिरे पुढे म्हणाले की, जीवनातील प्रत्येक वादळ आपल्याला संपवण्यासाठी येतं असतं असं नसून आपण काय आहोत, आपल्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी येत असतं. त्याकरिता संकटामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी चालून आलेली एक संधी असते. त्यासाठी संकटांवर असे तुटून पडले पाहिजे की, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरीही इतिहास घडला पाहिजे.

खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला विनोद अहिरे यांच्या हस्ते करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखविण्यात आली. विनोद अहिरे महामार्गावर सलग चाळीस किलोमीटर स्केटिंग करणार होते परंतु महामार्गाचे काम सुरू असल्याने ते शक्य नाही म्हणून बहिणाबाई गार्डनच्या पाचशे मीटर सिमेंट वॉकिंग ट्रॅकवर त्यांना ८० राऊंड मारायचे पण त्यांनी 91 मारले ते अंतर त्यांनी 2 तास 7 मिनिटांमध्ये पूर्ण केले. सदर प्रसंगी विनोद अहिरे यांचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पॅंथर स्पोर्ट्स क्लब तर्फे स्केटिंग खेळाडूंनी आयोजित केला होता.

Visit : Policenama.com