अंडाबुर्जीवरुन वाद, तरुणाच्या डोक्यात घातला तवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-अंडाबुर्जी खाण्यासाठी आलेल्या तरुणाने बुर्जी खराब झाल्याची तक्रार केल्याच्या कारणावरुन त्याला बेदम मारहाण करुन डोक्यात तवा घातला. तसेच त्याच्यावर चाकुने पोटावर, हातावर वार केल्याची घटना चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

गणेश बिच्छा शिंदे (वय ३१), शंकर चिन्नप्पा शिंदे, वय २८, दोघे रा. वैदुवाडी) या दोघांना अटक केली आहे. गुरूदेव लोखंडे (वय ३२, रा. वैदुवाडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे आणि शंकर शिंदे हे दोघे सेनापती बापट रस्त्याजवळ आयसीसी टॉवर बहिरटवाडी येथे अंडाबुर्जीची गाडी चालवतात. रविवारी रात्री नऊच्या सुमारास गुरूदेव लोखंडे हे अंडाबुर्जी खाण्यासाठी शिंदेच्या गाडीवर गेले होते.  अंडाबुर्जीचा पहिला घास खाल्यानंतर ती खराब झाल्याचे लोखंडेना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ही अंडाबुर्जी चांगली झाली नाही, दुसरी दे असे शिंदेला सांगितले. यावरून शंकर शिंदे याने लोखंडेंना शिवीगाळ सुरू झाली. यावरून दोघांमध्ये झटापट सुरू झाली असता, गणेश शिंदे याने कांदा कापायच्या धारदार चाकुने पोटावर, डाव्या व उजव्या हातावर वार करून जखमी केले. तर अंडाबुर्जीचा तवा डोक्यात मारून जखमी केले. यामध्ये लोखंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

बुकींग न करता भाडे स्विकारणे ‘ओला’ चालकाला पडले महागात
पुणे : पुण्यात रात्री कारचालकांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील कार, मोबाईल आणि पैसे लुटून नेणारी टोळी लुटून सक्रीय झाली आहे. सगल तिसरी घटना वारजे हद्दीत घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल वीर (वय २२, रा. गोसावी वस्ती, पुणे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अमोल वीर यांची स्वत:ची स्वीफ्ट कार आहे. ती ओला कॅबसाठी चालवतात. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास वीर हे कर्वेनगर येथे काकडे सिटी येथे थांबले होते. त्यावेळी चौघे त्यांच्यजवळ आले. आम्हाला बावधनला जायचे आहे असे सांगितले.

वीर यांनी ऑनलाईन बुकुींग न घेता परस्पर हे भाडे घेऊन मुंबई-बेंगलोर महामार्गाने चांदणी चौकाच्या दिशेने निघाले. त्यावेळी सुतारवाडी जवळ मागे बसलेल्या एकाने वीर यांच्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली. कार बाजूला घेण्यास लावली. त्यांना मारहाण करून खिशातील ६ हजार ५०० रूपयांची रोख, दोन मोबाईल असा ऐवज काढून घेतला. कारमधून खाली उतरवून चौघे कार घेऊन पळून गेले. याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला.