एकनाथ खडसेंच्या नाराजीवर मुनगंटीवार म्हणाले… जीना यहाँ मरना यहाँ…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ खडसे यांची भाजपवरील नाराजी स्पष्ट दिसत आहे. पक्षाकडून अन्यायपूर्व वागणूक मिळत असेल तर वेगळा विचार करावा लागेल असेही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नेत्यांची भेट घेतली. आज दुपारी त्यांनी पंकजा मुंडे यांची देखील भेट घेतली. त्यामुळे खडसेंच्या मनात काय सुरु आहे याबाबत भाजपमध्ये संभ्रम आहे. परंतू यानंतर भाजप नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आज एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, नाराज एकनाथ खडसे यांची भेट घेऊ. त्यांची समजूत काढू. अन्याय झाल्याची भावना असेल तर चर्चेअंती दूर करु.

पक्ष उभारण्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत मुनगंटीवार म्हणाले की इतके वर्ष त्यांनी पक्षासाठी काम केले, त्यानंतर त्यांना तिकिट मिळलं नाही याची खंत त्यांना असणार, हे साहाजिक आहे.

यावर बोलताना मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंसाठी गाणे देखील गायले. मुनगंटीवार म्हणाले.. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ…

भाजपची उत्तर महाराष्ट्रास्तरावरील 5 जिल्ह्यांची बैठक पार पडली होती. यानंतर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले होते की ओबीसी नेत्यांमुळे पक्ष मोठा झाला. काही लोकांकडून सातत्याने अन्याय होतोय. विरोधी भूमिका करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल. एकनाथ खडसेंनी दावा केला होता की मी प्रदेशाध्यक्षांकडे पुरावे सोपवले आहेत. एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात चर्चा देखील झाली होती.

याआधी पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत आपल्या समर्थकांत सूचक संदेश दिला आहे. आता भाजपचे अनेक नेते बंडाचा करण्याच्या विचारात दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली होती.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like