नवरात्राच्या शेवटच्या दिवशी अघटित घडलं ! देवासमोर पतीने दिला बायकोचा ‘नरबळी’

छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीगडमध्ये ( Chhattisgarh) की धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरात्रीच्या उपवासानंतर महिलेचे शव तिच्या घरात आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास केला असता पतीनेच पत्नीची हत्या केल्याची बाब उघड झाली. यामागील कारण ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. पतीने पत्नीचा नरबळी दिल्याचा खुलासा झाला आहे. हा आरोपी काळी जादु करीत होता.

छत्तीसगडमधील अंबिकापुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.शहरापासून जवळ असलेल्या सरगंवा गावात शुक्रवारी रात्री पतीने पत्नीची हत्या ( Murder )केली. आरोपीने पत्नीच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करीत तिची हत्या केली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरुन दिसत असलेल्या पुराव्यांवरून हा नरबळी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी वारंवार जबाब बदलत आहे. पत्नीच्या चरित्रावर संशय असल्याने तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. आरोपी गावात तंत्रमंत्र आणि काळी जादुचं काम करतो.

घटनेच्या आदल्या रात्री त्याच्या घरी पाहुणे आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर सर्व झोपण्यासाठी गेले. सकाळी जेव्हा आरोपीची सून जागी झाली तेव्हा तिने सांगितले की सासू पुजा घरात मृत अवस्थेत पडली आहे. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्रोपोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपीनी गावासमोर आपला गुन्हा ( Crime) कबुल केला आहे.याविषयी अधिक माहिती देताना कुटुंबीयांनी सांगितले की, तो पत्नीला वारंवार मारहाण करीत होता.त्याचे आणि पत्नीचे नेहमी भांडण होत असे. त्याने नवरात्रचे उपवास केले होते.त्यामुळे त्याने आपल्या पत्नीचा नरबळी दिला असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You might also like