आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला करण्यात आली विद्युत रोषणाई

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशावर आणि राज्यावर कोरोना संसर्गाचे संकट आले आहे. त्या पार्श्वभूमीवरती यंदाचा आषाढी पालखी सोहळा आणि पंढरपूरची आषाढी यात्रा रद्द करण्यात आली. मात्र, आषाढी यात्रा भरणार नसली तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने उदासीन भूमिका घेतलेली नाही.

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरावर पुणे येथील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर विनोद जाधव दरवर्षी विनामूल्य रोषणाई करुन देतात. त्यांच्या सहकार्यातून यंदाच्या वर्षी सुद्धा श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, या मनमोहक रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.