योगेश्वरी महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन    

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन योगेश्वरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील पी.एस. एम. विभागातील प्राध्यापक डॉ. विषेश लोहकपुरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

डॉ. लोहकपुरे यांनी आपल्या व्याख्यानात एड्स या आजाराविषयी विषयी सविस्तर असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एड्स संसर्ग होण्याची कारणे, रोगाची लक्षणे, घ्यावयाची खबरदारी व विविध उपाययोजना याविषयी माहिती सांगितली. तसेच एड्सविषयी समज व गैरसमजुती याविषयी माहिती सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स आजार झपाट्याने वाढत असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी तरुण तरुणीने विवाहापूर्वी एच. आय. व्ही. ची तपासणी करावी असे आवाहन केले.

तसेच यावेळी विद्यार्थ्यांना एड्स विषयी माहितीपट दाखवण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. बी. डी. देशमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. जोशी, प्रा. डॉ. व्ही. एस. हमदे, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिल नरसिंगे, डॉ. यशवंत हंडीबाग, तसेच स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील निवासी डॉ. विनोद बगाडे व डॉ. वनिता मायकर  व एम. सी. व्ही. सी. चे उपप्राचार्य श्री. पंडित कराड व उपप्राचार्य श्रीमती यू. एस. सरदार व प्रा. एस. एस. कुलकर्णी व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक उपस्थित होते.

तसेच यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रदर्शन स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील पोस्टर्स प्रदर्शनाचे परीक्षण प्रा. डॉ. एस. डब्ल्यू. भिवगुडे व प्रा. डॉ. जी. डी. सूर्यवंशी यांनी केले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. डी. देशमुख व यू. एस. सरदार  यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोस्टर्स व रांगोळीच्या  माध्यमातून एड्सविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिल नरसिंगे यांनी केले. आभार प्रा. डॉ. वाय. एस. हंडीबाग यांनी मानले. पोस्टर्स व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

पोस्टर्स प्रदर्शनमध्ये प्रथम पारितोषिक  तयूब शेख, द्वितीय रोहिणी फड व तृतीय क्रमांक बालकृष्ण अनवणे यांनी पटकावला. तसेच रांगोळी स्पर्धेचे प्रथम क्रमांक निकिता शिंदे, द्वितीय आरती उतवाल व पूजा फड आणि तृतीय क्रमांक अमृता बनसोडे यांनी मिळवला. यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.