‘मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय’, PM मोदींचे भावूक ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. मागच्यावर्षी याच दिवशी जेटली यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मागच्यावर्षी या दिवशी आपण अरुण जेटलीजी यांना गमावले. मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. त्यांनी मनापासून भारताची सेवा केली. त्यांची बुद्धि, कायदेशीर कौशल्य आणि व्यक्तीत्वाने ते महान होते. मोदींनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. अरुण जेटलीजी उत्तम राजकारणी, यशस्वी वक्ते आणि महान व्यक्ती होते. ते बहुआयामी आणि मित्रांचे मित्र होते. विशाल वारसा, परिवर्तनाचा दृष्टीकोन आणि देशभक्तीसाठी त्यांना नेहमी लक्षात ठेवले जाईल असे अमित शाह यांनी म्हटले आहे. आज माझ्या वडिलांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यांची उणीव मला जाणवते का? हो, जाणवते. त्यांची अनुपस्थिती जाणवते का? नाही, ते नेहमीच माझ्यासोबत आहेत असे अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटलीने ट्विटमध्ये म्हटले आहे.