Budget 2021 : आज 10 लाख रुपये जिंकण्याची संधी, त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी 10 लाख रुपये जिंकण्याची संधी क्रेड (CRED) अ‍ॅपने आपल्या ग्राहकांना दिली आहे. क्रेड अ‍ॅप क्रेडिट कार्डचे (Credit Card) चे बील भरण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. सध्या हे अ‍ॅप बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Union Budget) दिवशी कंपनीने ही खास ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही 2019-20 या आर्थिक वर्षातील तुमचा भरलेला आयकर म्हणजे इन्कम टॅक्स (Income Tax) पुन्हा मिळवू शकता. यासाठी विशिष्ट रक्कमेची मर्यादा असून आज तुम्ही या क्रेड अ‍ॅपवरुन क्रेडिट कार्डचे बिल भरल्यास तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे. मात्र, तुमचा क्रेडिट स्कोअर (Cridit Scrore) चांगला असणे आवश्यक आहे.

विजेत्याला मिळणार 10 लाख रुपये

आज (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात आहे. आज क्रेड अ‍ॅपवरुन आपल्या क्रेडिट कार्डचे बिल भरणाऱ्या एका भाग्यशाली विजेत्याला दहा लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. मात्र, ही रक्कम तुम्हाला आयकराच्या सुटीच्या रुपात मिळणार आहे. तुम्ही भरलेला तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न जर 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला ती पुन्हा परत मिळणार आहे. या दिवशी ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा अधिक असेल त्यांनी क्रेडिट पेमेंट केलं तर त्यांना ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. पण 10 लाख रुपये जिंकण्याची संधी केवळ एकाच व्यक्तीला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 59 लाख क्रेडिट कार्ड धारक या अ‍ॅपचा वापर करतात.

क्रेड (CRED) अ‍ॅप काय आहे

क्रेड अ‍ॅपमधून तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरु शकता. या अ‍ॅपमधून तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरल्यास तुम्हाला कॅशबॅक (Cashback) आणि क्रेड कॉईन (Cred Coin) देखील मिळते. फ्रीचार्ज चे को-फाउंडर कुणाल शाह यांनी 2018 मध्ये क्रेड या अ‍ॅपची निर्मिती केली. यामध्ये तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे बिल भरल्यास विविध कंपन्या तुम्हाला रिवार्ड पॉईंट देखील देतात. तुम्ही जितक्या रक्कमेचं बिल भरता जितके क्रेड कॉईन तुमच्या खात्यात जमा होतात. विशेष म्हणजे या अ‍ॅपवरुन तुम्ही घरभाडे देखील भरु शकता. यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो.