भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकात पाटील यांची फेरनिवड, मुंबईत केला बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बदल या महिन्यात अपेक्षित होता. राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची निवड झाल्यानंतर राज्यातील बदलांना पक्षाने सुरुवात केली आहे. मात्र, महाराष्ट्रात प्रदेशाध्य पदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली असून मुंबई प्रदेशाध्यक्षपदात बदल करून आमदार आशीष शेलार यांच्या जागी आमदार मंगलप्रभात लोढा यांची निवड झाली आहे.

भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही जोडी पक्षाने कायम ठेवली आहे. कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडून आले आहेत. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेले पाटील संघटना कुशल ही आहेत. राज्यात महसूलमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.

You might also like