मुंबईत पुन्हा एकदा किडनी रॅकेट उघडकीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

किडनी प्रत्यारोपणाची फाईल लवकर पुढे सरकवण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जे जे रुग्णालयातील दोघांना सापळा रचून रंगेहाथ पकडले. दोघांना ८० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. मुंबईतील जे जे हॉस्पिटल या राज्यातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधून हे रॅकेट चालवले जात होते. जेजे हॉस्पिटलमधून तुषार सावरकर आणि रहेजा हॉस्पिटलमधून सचिन साळवे अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. जेजे हॉस्पिटलमधील कर्मचारी तुषार सावरकर आणि रहेजा हॉस्पिटलचा किडनी प्रत्यारोपण समन्वयक सचिन साळवे हे दोघे जण किडनी प्रत्यारोपण रॅकेटचे चेहरे बनलेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d4b161e-c859-11e8-812f-b73eb607b3ba’]

४० वर्षांच्या जमालुद्दीन खान या रुग्णाला त्याच्या कुटुंबातील एक महिला किडनी दान करणार होती. डायलिसिसवर रोज उपचार सुरु असणाऱ्या जमालुद्दीन यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया माहिममधील रहेजा हॉस्पिटलमध्ये होणार होती. किडनी जरी कुटुंबातील व्यक्ती देणार असली, तरी त्यासाठी झोनल ट्रान्सप्लांट आॅथोरायझेशन कमिटीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. या कमिटीचे कार्यालय जेजे हॉस्पिटलमध्ये आहे. याच कामासाठी तुषार सावरकर आणि सचिन साळवे यांनी लाच मागितली होती.

तुषार सावरकर हा जेजे हॉस्पिटलमध्ये झोनल ट्रान्सप्लांट आॅथोरायझेशन कमिटीचा समन्वयक आहे, तर सचिन साळवे रहेजा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण समन्वयक आहे. या दोघांनी मिळून जमालुद्दीन यांच्या कुटुंबाकडे दीड लाखांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

मुंबईत डेंग्यूची दहशत, चार महिन्यांत ९ मृत्यू

पवईस्थित एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलमध्येही २०१६ किडनी रॅकेट उघडकीस आले होते. त्यावेळी हॉस्पिटलमधील मोठ-मोठे डॉक्टरही रॅकेटमध्ये सहभागी होते. या किडनी रॅकेटमध्ये १४ जणांना गजाआड करण्यात आले होते, त्यामध्ये ५ डॉक्टर, हॉस्पिटलचा प्रत्यारोपण समन्वयक, किडनी दाता आणि बृजकिशोर जैसवाल नावाच्या रुग्णाचाही समावेश होता.

[amazon_link asins=’B07CN3T5CK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6d13b8b-c859-11e8-b71b-7fab6b15d0c4′]

व्यापारी असणाऱ्या बृजकिशोर याने स्वत:साठी किडनीची व्यवस्था केली होती. पवई पोलिसांनी आॅपरेशन थिएटरमध्ये छापा टाकून किडनी रॅकेटचा पदार्फाश केला होता. काही महिन्यानंतर बृजकिशोर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरच महाराष्ट्र सरकारने किडनी प्रत्यारोपणासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लान्ट कमिटीची ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केली होती.