31 ऑक्टोबरला Blue Moon चा योग, जाणून घ्या अधिक माहिती

पोलीसनामा ऑनलाईन – या ऑक्टोबर महिन्यात दोनदा चंद्राचे दर्शन ( Moon) होणार आहे. त्यामुळे एकाच महिन्यात चंद्राचे दोनवेळा पूर्ण दर्शन झाल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ ( Blue Moon) असे म्हटलं जातं. येत्या ३१ ऑकटोबरला रात्री ८.१९ वाजता हा चंद्र म्हणजेच ‘ब्लू मून पाहण्याचा योग आला आहे. या महिन्यात २ तारखेला पहाटे २.३५ वाजता महिन्यातील पहिले पूर्ण चंद्रदर्शन झाले होते. त्यानंतर आताया महिन्याच्या शेवटी ३१ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा पूर्ण चंद्र दर्शन होणार आहे. उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो. पण चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तीत प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करड्या छटा मिसळल्याने तो निळसर भासू लागतो.खरेतर एखाद्या दुर्मिळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे म्हटले जाते.

दरवर्षी आपण प्रत्येक महिन्यात एक असे १२ पूर्ण चंद्र पाहतो. पण यावर्षी १३ चंद्र पाहण्याची संधी चालून आली आहे. यापूर्वी अशी घटना १३ वर्षांपूर्वी ३० जून २००७ रोजी घडली होती. त्यानंतर असा प्रसंग ३० सप्टेंबर २०५० रोजी येईल. २०१८ साली ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्लू मून’ दिसले होते.पण आता पुढील ‘ब्लू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिसणार आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये चार ऋतू असतात. यामध्ये ग्रीष्म, उन्हाळा, शरद, हिवाळा असे प्रत्येकी ३ महिन्यांचे चार ऋतू असतात. दर महिन्याला एक याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये तीन पूर्ण चंद्र दिसणे अपेक्षित आहे.

प्रत्येक पूर्ण चंद्र दिसण्याचा कालावधी हा २९ दिवस, १२ तास, ४४ मिनिटे, ३८ सेकंद इतका असतो. त्याचबरोबर वर्षाला ३६५ दिवस असतात. तसेच सौरवर्ष हे ३६५ दिवस ५ तास, १९ मिनिटे, ३० सेकंद इतक्या कालावधीचे असते. यामुळे वर्षभर आपल्याला १२ पूर्ण चंद्र असतात.दरम्यान, या कालावधीमधील १० दिवस आणि २०.९ तास अधिकचे असतात. अधिकचा कालावधी साचत जातो आणि दर ३० महिन्यांनी एकदा अधिकचा पूर्ण चंद्र दिसतो. ‘ब्लू मून’ ज्या ऋतूत दिसतो त्या ऋतूमध्ये त्या वर्षी तीनऐवजी चार पूर्ण चंद्र दिसतात. अशावेळी तिसऱ्या पूर्ण चंद्राला ‘ब्लू मून’ म्हटले जाते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात कमी दिवस असल्याने या महिन्यात ब्लु मून दिसत नाही.