विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणी आणखी एक आरोपी अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. मुकेश प्रल्हाद कांबळे (19, रा. बोपोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर यापूर्वी देवेंद्र रामलाल बीडलानी (20, रा. आंबेडकर चौक, औंध) आणि सॅमसन सुलेमान अँमेन्ट (20, कमान फॅक्ट्री, खडकी) या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी (दि. 7) दुपारी सातजणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हे शाखेच्या पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील एक आरोपी केएसबी चौकात येणार आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, गणेश सावंत, सचिन उगले, विशाल भोईर, प्रवीण पाटील यांच्या पथकाने सापळा रचून मुकेश याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे समोर आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली.

आरोग्य विषयक वृत्त –  

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

Loading...
You might also like