वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – उदयोजकाकडे जाऊन जबरदस्तीने ५ हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या व यापूर्वी तुम्हाला मारहाण केली होती, ओळखले ना, असे सांगून धमकी देणाऱ्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

जावेद पठाण (रा. बालाजीनगर, झोपडपट्टी, भोसरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हलागौडा शिवलिंग ओकांर (वय ४३, रा. दुर्गा निवास, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हलागौडा ओंकार याचे भोसरी एमआयडीसीमध्ये साई इंजिनिअर्स या नावाने कारखाना आहे. जावेद पठाण हा आपल्या दोन साथीदारांना घेऊन १८ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता हलागौडा यांच्या कारखान्यात आला व गणपती उत्सव साजरा करण्यासाठी दमदाटी करुन ५ हजार रुपयांची वर्ग द्या असे म्हणाला. तसेच ५ हजार रुपयांची क्रांतीवीर तरुण मित्र मंडळ असे नाव लिहिलेली पावती दिली. पैसे घेण्यासाठी नंतर येतो, असे सांगितले. जर वर्गणी दिली नाही तर पाहून घेतो. दोन महिन्यांपूर्वी मीच तुम्हाला मारले होते, ओळखले ना असे म्हणून शिवीगाळ करीत धमकी देऊन निघून गेला. हलागौडा यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी जावेद पठाण याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like