बीड हत्या प्रकरण : एका आरोपीला झाली अटक 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन  – बहिणीने प्रेम विवाह केल्याने मित्रांच्या सहकार्याने बहिणीच्या नवऱ्याची भर रस्त्यात हत्या करण्याचे प्रकरण बीड मध्ये घडले असून पुरोगामी विचारवंतानी या हत्येचा निषेद नोंदवत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. कृष्णा क्षीरसागर या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो मुख्य आरोपी बालाजी लांडगे याचा खूनातील सहकारी आहे तर मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढत आहे.

काय घडले होते हत्येच्या वेळी बीड जिल्ह्यातील तालखेड गावचा सुमित वाघमारे आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणारा विद्यार्थी होता. त्याच्याच वर्गात शिकणारी भाग्यश्री लांडगे या मुलीशी त्याची मैत्री झाली त्या मैत्रीत स्नेह वाढल्याने त्यांचे रुपांतर प्रेमात झाले.

त्यानंतर त्यांच्या नात्याला समाजातून विरोध होऊ लागला परंतु सुमित आणि भाग्यश्री या दोघांनी एकत्र राहण्याचा पक्का निर्धार केला होता. म्हणून त्या दोघांनी एकत्र येत मागच्या दोन महिन्या पूर्वी कोर्ट मॅरेज केली आणि शिक्षण घेतच आपल्या सुखी संसाराची सुरुवात केली. या दोघाच्या लग्नाला भाग्यश्रीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे भाग्यश्रीने घरच्यांच्या विरोधात जाऊन स्वतःचे लग्न स्वतःच्या मानाने केल्याचा राग तिच्या भावाच्या म्हणजे खूनाचा आरोपी असलेल्या  बालाजी लांडगे डोळ्यात खुपत होता.

१९ डिंसेबर रोजी परीक्षेसाठी महाविद्यालयात आलेल्या सुमित वाघमारेवर परीक्षेवरून परतत असताना महाविद्यालयाच्या गेटवरच त्याच्या पत्नी म्हणजे भाग्यश्री देखत धारधार शस्त्राने वार केले. एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीतून येऊन बालाजी लांडगे याने सुमितवर सपासप वार केले. त्यानंतर त्याच्या पत्नीने आरडा ओरडा केल्याने तिन्ही हल्लेखोर पळून गेले. भाग्यश्रीने मदतीसाठी लोकांना याचना केली पण कोणीच मदतीला आले नाही. तर शेवटी एका रिक्षावाल्याच्या मदतीने भाग्यश्रीने आपल्या पतीला दवाखान्यात नेहले. परंतु रक्तस्त्राव अधिक झाल्याने सुमितचा म्हणजे भाग्यश्रीच्या पतीचा मृत्यू झाला.

सुमितच्या आणि भाग्यश्रीच्या घरच्यांचे या आधी खूप वाद झाले होते. सुमितच्या खूनाची वार्ता कळताच त्याच्या कुंटुब आणि पै पाहुण्यांनी दवाखान्या बाहेर गर्दी केली. परिस्थीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोघांच्या घरांना आणि दवाखान्याला पोलीस संरक्षण दिले होते. पोलीस सध्या फरार असलेल्या बालाजी लांडगे आणि  संकेत वाघ यांचा तपास  करत असून  आरोपीना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांच्या समोर आहे.