‘ब्रॅंडेड’ कंपन्यांची दीड कोटींची नकली घड्याळे मुंबईत जप्त

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दिवाळी हंगामात होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीत नकली माल विकण्याचा प्रकार होत असतो. अशीच नामांकित कंपन्यांची बनावट मनगडी घड्याळे बाजारात विकली जात आहे, याची माहिती मिळाल्यावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ४ ने दोन ठिकाणी धाडी घालून तब्बल १ कोटी ३९ लाख ७२ हजार रुपयांची ८ हजार ४८९ घड्याळे व त्याचे कव्हर बॉक्स जप्त केले आहे.

पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना काळबादेवी येथे दोघे जण ब्रँडेड कंपनीची बनावट मनगटी घड्याळे विकत असल्याची माहिती मिळाली. सावंत यांनी या कंपन्यांच्या कॉपी राईटचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांना बोलावून त्याची खात्री करुन घेतली. त्यानंतर काळबा देवी येथील सुतार चाळ येथील रियल टाईम शॉप आणि डिवाईन कलेक्शन शॉप या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापा घातला. त्यात रियल टाईम शॉपमध्ये १ हजार ८०५ घड्याळे मिळाले असून तेथून हितेश प्रेमजी गडा (वय ३८, रा .सुतार चाळ, शेख मेमन स्ट्रिट) याला ताब्यात घेतले.

डिवाईन कलेक्शन शॉपमधुन ६ हजार ६९३ घड्याळे जप्त करुन तेथून कुंजन रमेश गडा (वय ३१) याला ताब्यात घेतले. या ठिकाणी ओमेगा, कालविन क्लेन, डाओर, पनेराईल, माऊंडब्लॅक अशा अनेक नामांकित कंपन्यांचे बनावट मनगटी घड्याळे अस्सल असल्याचे सांगून विकली जात होती.

मागील महिन्यात मज्जिद बंदर, नागपाडा, अलबसा मार्केट भागातून सुमारे सव्वा कोटी रुपयांची विविध नामांकित कंपन्यांची सुमारे ११ हजार मनगटी घड्याळे जप्त करण्यात आली होती. हा सर्व बनावट माल दिवाळीच्या हंगामात विकला जाणार होता.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या