Coronavirus : दीड वर्षाचा चिमुरडा ‘कोरोना’च्या विळख्यात

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा विळखा  घट्ट झाला असून  मुंबई आणि परिसरात  दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.  नवी मुंबईत एका कुटुंबातल्या दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कुटुंबातल्या तिघांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे.नवी मुंबईतला हा चिमुरडा  8वा कोरोनाबाधित रुग्ण झाला आहे. आता या चौघांवरही मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत आज विदेशातून आलेले 95 नागरीक आढळून आलेत. त्या सगळ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नवी मुंबईतल्या एका मशिदीमध्ये फिलिपाईन्सचा नागरीक आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याच्यामुळे मशिदीतल्या मौलानांना लागण झाली. नंतर त्यांचा मुलगा, सून आणि आता नातवालाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. असे असतानाही काही नागरिकांकडून बेजबाबदारपणे वागले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी वारंवार सूचना देउनही अनेकांनी घरात बसणे पसंत केले नाही. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे.