पाण्यात बुडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

विरार : पोलीसनामा ऑनलाइन – आंघोळीसाठी काढलेल्या गरम पाण्याच्या टपामध्ये पडून एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. आई कचरा टाकण्यासाठी गेली असता. चिमुकली खेळत बाथरुममध्ये गेली. त्यावेळी तिला आंघोळ घालण्यासाठी काढलेल्या गरम पाण्याच्य टपमध्ये ती पडली. अवनी भरत सोनवणे असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

सोनवणे परिवार पूर्व कोपरी परिसरात वास्तव्यास आहे. अवनीचे वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तिच्या आईने तिला आंघोळ घालण्यासाठी गरम पाणी काढले होते. दरम्यान कचरा गाडी आल्याने आई कचरा टाकण्यासाठी बाहेर गेली. त्यावेळी अवनी घरामध्ये एकटीच होती. कचरा टाकून परत आल्यानंतर त्यांना अवनी घरामध्ये दिसली नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. शेजाऱ्यांकडे अवनी नसल्याने त्यांनी घरामध्ये तिचा शोध घेतला. त्यावेळी बाथरुममध्ये तिच्या आंघोळीसाठी काढलेल्या पाण्याच्या टपमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

अवनिला बेशुद्ध अवस्थेत तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. अनिच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विरार पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक