प्रेमसंबंध मान्य नसल्यानं वडिलांनीच मुलीचे केले तुकडे, अर्धाभाग बॅगेत टाकून ठेवला स्टेशनवर

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण स्टेशन परिसरातील टॅक्सी स्टँडजवळ रविवारी (दि.8) एका बॅगेत शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेचा कमरेपासून अर्धा मृतदेह बॅगेत ठेवणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. अरविंद तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीने आपल्याच पोटच्या मुलीचा खून करून तिचे तुकडे केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. केवळ तिचे प्रमसंबंद मान्य नसल्याने तिचा खून करून मृतदेहाचे तुकडे करुन कंबरेखालचा भाग बॅगेत ठेवल्याचे आरोपी अरविंद तिवारीने सांगितले. तसेच वरचा भाग टिटवाळा येथे पुरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला चार मुली असून ही मोठी मुलगी होती. त्याने राहत्या घरी तिचा खून केला. तर मृतदेहाचा खालचा भाग तो कल्याण स्थानकावरून नेत असताना हा प्रकार उघडकीस आला. कसलाही ठोस पुरावा हाती नसताना केवळ चोवीस तासाच ठाणे गुन्हे शाखा आणि उल्हासनगर युनिटने गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली.

दरम्यान, कल्याण स्टेशन परिसरामध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह बॅगेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. बॅग ठेवणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ठाणे गुन्हे शाखा आणि उल्हासनगर युनिटने आरोपीला अटक केली. पोलीस आरोपीची चौकशी करत असून या घटनेमुळे गजबजलेल्या स्टेशन परिसरात ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.