गावठी कट्टा बाळगणारा अटकेत

पुण : पोलीसनामा ऑनलाईन – गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. हैदर अली नबी शेख (२५, नागपूर चाळ येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी येरवडा येथे बदामी चौकातील सुदामा भेळ येथे एक व्यक्ती असून त्याच्या कंबरेला पिस्तूलासारखे हत्यार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.