शालेय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणारा आरोपी जेरबंद

कुंडलवाडी : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – शरीराच्या संपूर्ण भागावर बांबू व चामडी पट्ट्याचे व्रण पाहून त्यांचे माता-पिता, नातेवाईक, शेजारी यांनी संताप व्यक्त केला. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने या मारहाणीत विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. सदर घटना डीवायएसपी नुरुल हसन यांना कळताच त्यांनी तत्काळ कुंडलवाडीस येऊन गंभीर मारहाणीने दुखापत झालेल्या तिन्ही शालेय विद्यार्थ्यांची झालेल्या प्रकाराबद्दल विचारपूस करून वैद्यकीय तपासणी अहवाल पाहता दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या. ३० आॅक्टोबरच्या रात्री येथील इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दोन आरोपींनी बेदम मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या.

याबाबत सविस्तर माहिती, कुंडलेश्वर मंदिर परिसरातील अजय पी. इरन्ना उन्हाळे (वय १४), शुभम कोंडलिंग स्वामी, संतोष मोहन शिरामे (सर्व रा. कुंडलवाडी) या शालेय विद्यार्थ्यांना ३० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजता आरोपी सुनील शिवराम कोटलावार याने ‘तुम्ही तिघे अनिल इटलावार याच्यासोबत का फिरता’ असे विचारत येथील के़रामलू मंगल कार्यालयात जबरदस्तीने मोटारसायकलवर ( एम.एच. २६-ए़.वाय.९१०२) बसवून घेवून आला. तेथे अगोदरच नागेश दिगांबर तडकासाट हा होता.

कार्यकारी अभियंत्याच्या अंगावर काळे ऑईल ओतले 

मंगल कार्यालयातील एका खोलीत बंद करून या तिन्ही विद्यार्थ्यांना चमड्याच्या पट्ट्याने मारहाण केली व नागेश तडकासाट याने बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. फिर्यादी अजय उन्हाळे, शुभम स्वामी व संतोष शिरामे यांच्या शरीराच्या संपूर्ण भागावर बांबू व चामडी पट्ट्याचे व्रण पाहून त्यांचे माता-पिता, नातेवाईक, शेजारी यांनी संताप व्यक्त केला. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने या मारहाणीत विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले.

सदर घटना डीवायएसपी नुरुल हसन यांना कळताच त्यांनी तत्काळ कुंडलवाडीस येऊन गंभीर मारहाणीने दुखापत झालेल्या तिन्ही शालेय विद्यार्थ्यांची झालेल्या प्रकाराबद्दल विचारपूस करून वैद्यकीय तपासणी अहवाल पाहता दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या. उपविभागीय पोलीस अधिका-यांनी झालेल्या गंभीर प्रकाराची स्वत: दखल घेत तपास स्वत:कडे घेतल्याने स्थानिक पोलिसांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. के़रामलू मंगल कार्यालय नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिले असून त्याची रात्रीच्या वेळी चावी आरोपीकडे कशी काय देण्यात आली ? अनिल इटलावार याचा या घटनेशी काय संबंध ?

चिखली कुदळवाडी येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग 

धर्माबाद परिसरात एकच खळबळ की प्रथमच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तपास घेण्याचा प्रकार म्हणजे स्थानिक पोलीस यंत्रणा यावर अविश्वास असणे की काय अशी चर्चा नागरिकांतून रंगली.