विमान तिकीटाची रक्कम परस्पर हडपणाऱ्याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विमान तिकीट बुक करून देण्याच्या बहाण्याने १ लाख रुपये खात्यात भरण्यास लावले. त्यानंतर तिकीटे बुक करून ते ऐन वेळी रद्द केले. त्यानतंर ती रक्कम परत न करता अपहार केल्याप्रकरणी एकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सरबजीत सिंग हरजीतसिंग होरा (३०, एम्पायर गंगा व्हिलेज शेजारी, हांडेवाडी रोड हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या महिला साथीदाराला पोलिसांनी यापुर्वी अटक केलेली आहे. याप्रकरणी संकेत सदाफळे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत सदाफळे यांच्या मित्रांना मॉरिशस ते मुबंई विमान तिकीट बुक करायचे होते. त्यावेळी सरबजीतसिंग होरा व त्याच्या महिला साथीदाराने मॉरीशस ते मुंबईचे तिकीट बुक करण्यासाठी १ लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना तिकीट बुक करून ते व्हाटस अपवर पाठविली.

मात्र त्यांचे मित्र विमानतळावर गेल्यावर त्यांची तिकीटे ऐनवेळी रद्द करून ती रक्कम परत न करता तिचा अपहार केला. याप्रकरणी दत्तावाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या महिला साथीदाराला २४ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यानंतर सरबजितसिंह होरा याला अटक करण्यात आली आहे. त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, सहायक पोलीस फौजदार घावटे यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like