फेसबुकवर RSS ची जैश सोबत तुलना, तरुणाला बेड्या

लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या सोशल मिडीयावर ट्रोल करण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. परंतु फेसबुकरवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी करणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. उत्तरप्रदेशातील जवरल खंड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

रशीद अहमद असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक आरएसएस नेता अजय कुमार वर्मा यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

जवरल खंड़ येथील रशीद अहमदने फेसबुकवर आरएसएसची तुलना जैश ए मोहम्मद संघटनेशी करणारी पोस्ट केली होती. त्यावर आरएसएस नेता अजय कुमार वर्मा यांनी नाराजी व्यक्त करत यामुळे आरएसएसचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानतंर पोलिसांनी रशीदचा शोध सुरु केला. मंगळवारी  जरवल येथील चौकात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. कलम २९५ ए आणि ५०५ नुसार त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नवीन मिश्रा यांनी दिली.