अल्पवयीन मुलीचे अपहऱण करणाऱ्याला कर्नाटकातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली.

दयानंद कांबळे (२५) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील दरोडे मळा येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी वस्तीतील दयानंद कांबळे हादेखील गायब असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त कऱण्यात आला होता. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणासह अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी कर्नाटक राज्यात व हैद्राबाद शहरात जाऊन तपास केला त्यावेळी संशयित तरुणाला मुलीसह कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले. त्यांना दोखांनाही पुण्यात आणून तपास केला. त्यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस उपनिरीक्षक निखील पवार, कर्मचारी सागर जगताप, विनोद साळुंके, महिला कर्मचारी श्रृती शिकलगार यांच्या पथकाने केली.

You might also like