गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या नको ‘त्या’ ठिकाणी मुद्दाम ‘स्पर्श’, युवकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गर्दीचा फायदा घेऊन पीएमपी बसमधून जाणाऱ्या तरुणीच्या नको त्या ठिकाणी मुद्दाम स्पर्श करुन विनयभंग करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. भरत बबन कदम (वय ३८, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. ही घटना मार्केटयार्ड पिंपळे गुरव बसमध्ये महापालिका बसस्टॉपजवळ मंगळवारी सायंकाळी घडली.

पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणींना गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांना धक्के मारणे, त्यांच्या शरीराला जाणीवपूर्वक स्पर्श करणे असे चाळे करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, अनेकदा तरुणी, महिला हे सहन करतात. एका तरुणीने मात्र त्याविरोधात आवाज उठवून तक्रार केली.

याप्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव ही बस पुणे महापालिका बस स्टॉपवर आली. ही तरुणी बसमध्ये बसली. तिच्या मागील सीटवर बसलेल्या भरत कदम याने मुद्दाम तिच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. बस पिंपळे गुरुव येथे पोहचताच तिने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी भरत कदम याला अटक केली आहे. सांगवी पोलिसांनी हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like