अनैतिक संबंधातून प्रियसीच्या पतीचा खून, एकला अटक

पिंपरी – चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन अनैतिक संबंधाला अथडळा होत असलेल्या प्रियसीच्या पतीचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही घटना तळवडे येथे सोमवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली होती.

बाळासाहेब भाऊसाहेब सपाटे (वय-३४ रा. शिवनगरी, गणेश मंदिराजवळ, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रामदास कांबळे  असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
[amazon_link asins=’B074W7Z7PN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee17f3f3-d225-11e8-b542-4d12babc293d’]

मयत रामदासच्या पत्निचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधाला रामदासचा अथडळा होत असल्याने आरोपीने रामदासचा काटा काढण्याचे ठरविले होते. आरोपीने रामदासला तळवडे येथील इंद्रायणी नदीच्या निर्जन स्थळी नेऊन दारु पाजली. रामदास दारुच्या नशेत असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

राज्यातील 10 पोलिस उपायुक्‍तांच्या बदल्या

सोमवारी रामदासचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहावर रंजना असे नाव गोंदले असल्याने पोलिसांनी या व्यक्तीचा परिसरात शोध घेतला. मात्र, मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेऊन अटक केली.

[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa952007-d225-11e8-8c7c-9d10ab867ffc’]

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक दिपाली मरळे, गणेश पाटील, सहायक पोलीस फौजदार भिवशेन सांडभोर, पोलीस हवालदार संतोष बर्गे, नारायण जाधव, पोलीस नाईक किशोर शेटे, किरण खेडकर, महंमद नदाफ, राजेंद्र बारसिंगे यांच्या पथकाने केली.