पुण्यात गांजा विकणाऱ्याला बेड्या, १ किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील हडपसर परिसरातल गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून १ किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

राणू पांडूरंग राखपसरे (वय ५१, रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बापू पायकर हे हडपसर परिसरात गस्त घालत असलाना मांजरी बु. येथून वाहणाऱ्या छोट्या कॅनलच्या बाजूने आले. तेव्हा हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगार राखपसरे हा गांजा बाळगताना मिळून आला. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांना १ किलो ४२० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा जप्त करून त्याच्याविरोधात हड़पसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने १४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर, पोलीस उपनिरीक्षक सुभाष तागड, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिर्के, अर्जून दिवेकर, पोलीस कर्मचारी महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, महिला कर्मचारी हेमा ढेबे, कर्मचारी सचिन चंदन, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त –

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम

कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

डोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, दुर्लक्ष करू नका