आष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक

आष्टी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बोरोडी पारोडी रोडवरील हातोळण फाटा येथे एका गांजाची चोरटी विक्री करणाऱ्यास अटक करण्यात आली. ही कारवाई अंभोरा पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचून केली. या कारवाईत ३० किलो गांजा, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३० हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आष्टी तालुक्यातील बोरोडी पारोडी येथून जाणाऱ्या रोडवर बोरोडी शिवारातील हातोळण फाट्यावर दोनजण गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हातोळण फाट्यावर सापळा रचून दुचाकीवरील हनुमंत सुद्रिक (रा. पिंपरी आष्टी) आणि विजय गाडे (रा. वहिरा) यांना अडवले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन विजय गाडे हा फरार झाला तर हनुमंत सुद्रीक हा पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये ३ लाख ८ हजार ४८० रुपयांचा ३० किलो ८४८ ग्रॅम वजनाचा गांजा, ५१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि दुचाकी असा एकूण ४ लाख ३० हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डी.बी. कुकलारे, पोलीस उप निरीक्षक आर.पी. लोखंडे, पोलीस नाईक पी.व्ही. देवडे, पोलीस शिपाई काळकुटे, ए. सी. बोडखे, बी. डी. हवेले यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त