पिस्तूल विक्रीसाठी आलेला अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईताला येरवडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूले, ५ जिवंत काडतुसे, एक पालघन, कोयता, व एक स्विफ्ट कार जप्त केली आहे.

महेश श्रीहरी गारुते (२७, बकोरी ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गारुते याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात शरीराविरूद्धचा गंभीर गुन्ह दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुले नगर आरटीओजवळ लाल रंगाच्या कारमध्ये एकजण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती पोलीस हवालदार मांजुळकर यांना मिळाली. त्यानुसार येरवजा पोलिसांनी सापळा रचून रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे, कोयता आणि पालघन मिळून आली. त्यानंतर त्याच्याकडून कारसह पिस्तूल, कोयता व त्याची कार जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात येरवजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक कऱण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गवारी, सहायक पोलीस निरीक्षक बहिरट, कर्मचारी मांजुळकर, जाधव, रणदिवे, जाधव, सकट यांच्या पथकाने केली.