पुण्यात बॅग चोरी करणाऱ्याला अहमदनगरमध्ये अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवार दि.13 एप्रिल 2019 रोजी विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट,कॉमर्स अँड सायन्स कोंढवा बुद्रुक, पुणे येथे इंडियन नेव्ही ट्रेडमॅन या विषयाची ऑनलाइन परीक्षा देण्याकरता धीरज अशोक गवारे(वय 29, राहणार. एन सी ए कॉलनी, कांजुरमार्ग वेस्ट, मुंबई) आले असता. परीक्षेसाठी दुपारी 3.00 वा. सुमारास परीक्षा हॉलच्या आत जाने असल्याने बॅग परीक्षा हॉलच्या बाहेर ठेवली. परीक्षा झाल्यावर 6.00 सुमारास परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर बॅग मिळून आली नाही. त्या बॅग मध्ये 15 हजार रुपये रोख रक्कम, परकीय चलनी नोटा, एम आय कंपनीचा मोबाईल हँडसेट, सिको कंपनीचे घड्याळ, रेबन गॉगल, विविध बँकेचे एटीएम डेबिट आणि क्रेडिट कार्ड, दुचाकी गाडीची चावी व घराची चावी असा एकूण 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

सदर तक्रारीची दखल घेत कोंढवा पोलिसांनी घटना घडलेल्या कॉलेज मधील व आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित इसम हा धीरज गवारे यांची बॅग घेऊन जात असल्याचे दिसले. कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या सर्व परीक्षार्थीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. विनायक चौधरी (राहणार. पिसोरे, जिल्हा अहमदनगर) हा बॅग घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतर विनायक चौधरी हा अहमदनगर ठिकाणी असल्याची सुत्रांकडून गुप्त माहिती मिळताच. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार राजेश शेख, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार यांनी विनायक चौधरी याला बेलवडी, जिल्हा अहमदनगर येथे सापळा रचून ताब्यात घेऊन सखोल चौकशी करत सदर गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेल्या संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची कामगिरी, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हेशाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सागर काळे, पोलीस हवालदार राजेश शेख, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, सुशील धिवार, किरण मोरे यांनी केली.