‘MBBS’ला प्रवेश देतो सांगून फसवणूक करणाऱ्यांना ‘रेडहॅन्ड’ पकडलं !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमबीबीएस’ला मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश करुन देतो सांगून 15 लाख रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. हा प्रकार तळेगाव येथील एमआयएमईआर या वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

या प्रकरणी महाविद्यालयाचे डॉ. धनाजी साधुराव जाधव (42, रा. वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. तर रिजवान अब्दुलरहमान मोहम्मद (32, रा. जाफरनगर, नागपुर) आणि सुशांत उपेंद्रसिंह परमार (34, रा. सुतारवाडी, पुणे) या दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.धनाजी जाधव यांच्या महाविद्यालयात एका मुलीला एमबीबीएस ला प्रवेश घ्यायचा होता. दरम्यान त्या मुलीची परमार आणि मोहम्मद यांच्याशी संपर्क झाला. तळेगाव येथील एमआयएमईआर या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे त्या मुलीला आणि तिच्या पालकाना दोघांनी सांगितले. त्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली.

परमार आणि मोहम्मद या दोघांनी प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी पैसे घेऊन एमआयएमईआर या वैद्यकीय महाविद्यालयात बोलवले. या ठिकाणी संबंधित मुलीला आणि त्यांच्या पालकाना प्राचार्य जाधव यांना भेटवले. दरम्यान संशय आल्याने प्राचार्याने पोलिसांना माहिती दिली. तत्काळ वरिष्ठ निरीक्षक वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने महाविद्यालयात जाऊन दोघांना ताब्यात घेतले असता हा फसवणुकीचा प्रयत्न समोर आला. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –