घरफोड्या आणि वाहनचोऱ्या करणारा अटकेत, ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरफोड्या व वाहनचोऱ्या कऱणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सोन्या-चांदीचे दागिने, २ चारचाकी व २ दुचाकी यांचा समावेश आहे.

पप्पूसिंग घागासिंग टाक (वय २३, रा. बिराजदार नगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांचे तपास पथक हद्दी त चोरी, घरफोडी,. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी प्रताप गायकवाड व नितीन मुंढे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पप्पूसिंग टाक याला अटक करण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मिळून आले. त्यानंतर त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. त्यावेळी कोठडीत केलेल्या चौकशीदरम्यान त्याच्याकडून ४ वाहनचोरी आणि १ घरफोडीचा गुन्हा उघडकिस आणला. पोलिसांनी २ चारचाकी, १४४ ग्रॅम वजनाचे चांदिचे तर २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि आणि २ दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, कर्मचारी युसुफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, सैदोबा भोजराज, राजू वेगरे, गणेश दळवी, नितीन मुंढे, अकबर शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली.