निमगांव केतकी खून प्रकरणी एका आरोपीला अटक

इंदापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

गोतोंडी तालुका इंदापूर येथील आनंत सोपान माने या युवकाने व्याजाने घेतलेले पैसे व व्याज न दिल्याने खाजगी सावकार सोमनाथ भिमराव जळक व शिवराज कांतीलाल हेगडे यांनी संगनमताने मयत आनंत माने याचा खुन करून पुरावा नष्ट करणे कामी त्याचा मृतदेह विहिरीत टाकून फरार झालेल्या दोन आरोपी पैकी शिवराज कांतीलाल हेगडे वय २४ रा. हेगडे वस्ती ता. इंदापूर या आरोपिला इंदापूर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या असून दि.३ आॅक्टोंबर २०१८ रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि.९ आॅक्टोंबर पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e840119d-c71a-11e8-921d-61db4698ca38′]

तर मुख्य आरोपी सोमनाथ भिमराव जळक रा. तरंगवाडी ता.इंदापूर हा फरार असून त्याच्या शोधासाठी इंदापूर पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाली आहेत. शिवराज हेगडे याला ३ आॅक्टोंबर रोजी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक आर.जी.गोमारे व त्यांच्या पथकाने न्यायालयासमोर उभे केले. सरकारी वकीलांनी शिवराज हेगडे या आरोपीला ७ दिवस पोलिस कस्टडी रिमांड मिळण्याबाबत विनंती केली.

यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड.पाटील यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी याने खुन केला असल्याबाबतीत तपास करणे बाकी आहे, गुन्ह्यात आरोपीने मयत आनंत माने यास ठार मारण्यासाठी कोणत्यातरी घातक हत्याराचा वापर केलेला असून त्या हत्याराबाबत त्या आरोपीकडे तपास करुन ते हत्यार पुराव्याकामी जप्त करावयाचे आहे, गुन्ह्यात आरोपीने ठार मारण्यासाठी वेरना कारचा वापर केला असून सदर वेरना कार जप्त करावयाची बाकी आहे, सदर गुन्ह्यातील आरोपी नं.१ हा फरार असून त्याला अटक करावयाची बाकी आहे.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’efd3eb07-c71a-11e8-81be-5370d83eb478′]

सदर गुन्ह्यातील आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेली कपडे जप्त करावयाची बाकी आहेत, सदर आरोपीने मयतास ठार मारण्यासाठी कट रचला होता त्याबाबतचा चौकशी तपास करावयाचा आहे, गुन्ह्यातील आरोपी व मयत यांच्यात असलेले व्याजाचे पैसे याबाबत तपास करणे बाकी आहे, सदर गुन्ह्यातील आरोपीने मयताचे व्याजाचे पैशात ३० गुंठे जमिनीची खुश खरेदी करुन घेतलेली आहे. त्याबाबत तपास करावयाचा आहे, सदर गुन्ह्यात सखोल तपास करणे बाकी असल्याने आरोपीला ७ दिवसाची पोलिस कस्टडी मिळण्याची विनंती सरकारी वकील अॅड.पाटील यांनी केली होती.

न्यायालयाने ती मंजूर करुन आरोपीला दिनांक ९ आॅक्टोंबर पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून आरोपीची रवानगी पोलिस कस्टडीत करण्यात आली. बारामती पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांचे प्रमुख मार्गदरर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक मधुकर पवार,पोलीस उपनिरिक्षक आर. जी. गोमारे. व त्यांचे पथकाने घटनेचे गांभिर्य ओळखुन तपासाची सुत्रे वेगाने हलविली व एका आरोपीला बेड्या ठोकल्या.त्यामुळे नागरीकामधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

१५ वरिष्ठ पाेलिस निरीक्षकांच्या (Sr. PI) बदल्या