धक्कादायक ! मारहाणीत कुत्रीचा मृत्यू ; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – रस्त्यावरील भटक्या कुत्रीला बेदम मारहाण केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेले असता जखमी कुत्रीचा मृत्यू झाला. कुत्रीला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार वाकड येथील शंकर कलाटे नगर येथे मंगळवारी साडेदहाच्या सुमारास घडला.

या प्रकरणी प्राजक्ता कुणाल सिंग (32, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. तर रिपन सबुर इस के (23, रा. कलाटे नगर, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाटेनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर एक भटकी कुत्री फिरत होती. या कुत्रीला रिपन याने बेदम मारहाण केल्याने ती जखमी झाली. त्यावेळी प्राजक्ता आणि त्यांच्या मित्रांनी जखमी कुत्रीला औंध येथील पशुवैदकिय दवाखान्यात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान कुत्रीचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात भादवी कलम 429 प्राणांचे छळ प्रतिबंध अधि. कलम (1) (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like