अल्पवयीन मुलीला केले ‘गर्भवती’, आंबेगाव पठार येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नातेवाईक असलेल्या अल्पवयीन १५ वर्षाच्या मुलीशी प्रेमसंबंध वाढवून तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवल्याने ही मुलगी त्यातून गर्भवती राहिली आहे. त्यातून हा प्रकार उघडकीस आला असून भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

प्रविण लक्ष्मण हरपुडे (वय १९, रा. आंबेगाव पठार) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १५ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार आंबेगाव पठार येथे ऑक्टोबरमध्ये घडला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. प्रविण याने या १५ वर्षाच्या मुलीबरोबर ओळख वाढवून प्रेम संबंध निर्माण केले. तिला स्वत:च्या घरी बोलाविले. ती अल्पवयीन आहे, हे माहिती असताना तिच्यासमवेत शरीर संबंध निर्माण केले. त्यातून ती गर्भवती राहिली. दोन महिन्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/