खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांकडून एकाला अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

कोंढवा येथे ४ लाखाची खंडणी घेऊन धमकवल्या प्रकरणी कोंढवा पोलीसानी एकास अटक केली आहे. शेरू रेहमान खान (वय ३६, रा , गल्ली न.८, मीठानगर कोंढवा खुर्द) यांचे वर खंडणीचा गुन्हा याप्रकरणी दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. याबाबत फिर्याद इस्माईल इनामदार (रा. ,इनामदार वाडा, कोंढवा बुद्रुक गावठाण) यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22fbe161-d227-11e8-bb14-0ba7fea682af’]
फिर्यादी इस्माईल इनामदार यांच्या इमारतीचे काम कोंढवा परिसरात चालू होते. फिर्यादीचे बांधकाम अनधिकृतरित्या चालू आहे, त्यामुळे आरोपी शेर रेहमान याने इस्माईल इनामदार यांना दमदाटी करून बांधकाम होत असलेल्या इमारतीत एक फ्लॅट व एक दुकान यांचीची मागणी केली.

फिर्यादी यांचे दाजी रियाझ शेख यांनी या धमकीला घाबरून आरोपीला ४ लाख दिले, परंतु आरोपीने अजून पैशाची मागणी केल्याने आपल्याला याबाबतची तक्रार करणे भाग पडले, असे फिर्यादी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेरू रेहमानवर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहे.