केसनंदजवळ 20 किलो गांजासह एकास अटक, 3 लाख 75 हजारांचा ऐवज केला जप्त, LCB ची कारवाई

शिक्रापुर – वाघोली-केसनंद रोडवर केसनंदजवळ दुचाकीवरून २० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या एकास एलसीबीने कारवाई करून पकडले असून त्याच्याकडून ३ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अंबु उर्फ अंबादास दशरथ पवार (वय ३५ रा. कोलवडी) असे गांजा घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडून २ मोबाईल, दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्यावर एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(ब), २०(ब) 2(क) नुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , पुणे अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणिकंदचे पो नि प्रताप मानकर,सहा.पो.नि. नेताजी गंधारे,पोसई रामेश्वर धोंडगे,पोसई हनुमंत पडळकर,स.फौ. दत्तात्रय जगताप,पोहवा राजू पुणेकर,पोहवा मुकुंद आयचीत,पोहवा.प्रकाश वाघमारे,पोना. चंद्रकांत जाधव,पो कॉ बाळासाहेब खडके,पोकॉ. समाधान नाईकनवरे,पो कॉ अक्षय जावळे,पो कॉ प्रसन्ना घाडगे,म पो हवा जोती बांबळे,म.पोकॉ. सुनीता मोरे यांनी केलेली आहे.