गावठी दारुसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त ; एकाला अटक

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (एल.सी.बी.) शाखेचे पथकाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत पुणे-सोलापूर रोडने अवैध गावठी हातभट्टी दारूची वाहतुक करणाऱ्या पिकअप जिपसह एका आरोपीस ताब्यात घेवून ५,५६,०००/- रुपयाचा माल जप्त केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. मारुती मांजरिया राठोड (वय. ४०, रा. डाळिंब, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, दिनांक २६ मे २०१९ रोजी सकाळी यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरीभडक, बोरीफाटा, पुणे-सोलापूर हायवे, ता.दौंड जि.पुणे येथे बोरीऐंदी गावाकडून सोलापूर रोडकडे भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा पिकअप जीपचा पाठलाग करून त्यास अडथळा करून आरोपी चालक मारुती राठोड यास ताब्यात घेवून महिंद्रा पिकअप जीप नंबर एमएच ४२ एम ८८०६ चे पाठीमागील हौदयात ३५ लिटरचे एकूण २८ कॅनमध्ये विक्री करणेसाठी वाहतुक करीत असलेली अवैध हातभट्टी तयार दारू ९८० लिटर व महिंद्रा पिकअप सह किं.रू.५,५६,०००/- असा माल जप्त करणेत आलेला आहे.

जप्त मुद्देमाल व आरोपी यास पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. यातील आरोपी हा सराईत असून पहाटे सकाळच्या वेळी पोलीसांची रात्रगस्त संपलेवर पिकअप जीपमध्ये गावठी दारूने भरलेले कॅनवर दुधाचे मोकळे कॅरट ठेवत असल्याने त्याचा कोणालाही संशय येत नसायचा.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली महेश गायकवाड, निलेश कदम, गुरु गायकवाड, सुभाष राऊत यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like