…तर 50 वर्षानंतर भारताला सहारा वाळवंटाप्रमाणे उष्णतेचा ‘सामना’ करावा लागेल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर सुधारलो नाही तर पुढील ५० वर्षांत भारतात उपस्थित १.२० अब्ज म्हणजे १२० कोटी लोकांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागेल. सहारा वाळवंटात पडते तशी गर्मी असेल. हे केवळ यामुळे होईल कारण तोपर्यंत जागतिक तापमानात वाढ झालेली असेल. याचे कारण प्रदूषण, झाडे तोडणे आणि ग्लोबल वार्मिंग हे असेल. भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानसह १० देश यापासून लांब राहणार नाहीत.

ब्रिटनच्या एक्सटेर युनिव्हर्सिटीचे संशोधक टिम लेंटन म्हणाले की, हे आकडे पाहून मी हैराण झालो. मी बर्‍याचदा तपासले पण हेच आकडे समोर येत होते. ग्लोबल वार्मिंगचा सर्वात मोठा धोका मानवालाच आहे. तेच सर्वात जास्त अडचणीत सापडतील.

नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित टिम लेंटनच्या अहवालानुसार, माणूस अजूनही अशा भागात राहणे पसंत करतात जेथे सरासरी किमान तापमान ६ डिग्री आहे आणि सरासरी कमाल तापमान २८ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. याच्या वर किंवा खाली गेल्यास त्यांना समस्या होऊ शकते.

परंतु आता जगातील बर्‍याच देशांमध्ये जमीन समुद्रापेक्षा वेगाने तापत आहे. म्हणजेच या शतकाच्या अखेरीस जेव्हा जागतिक तापमानात सरासरी ३ अंश सेल्सिअसची वाढ होईल, तेव्हा मानवांना वेगवेगळ्या देशांच्या आणि तेथील हवामानानुसार ७.५ डिग्री जास्त तापमानाचा सामना करावा लागेल.

म्हणजेच, जर तुम्ही भारतात राहता आणि उन्हाळ्यात तापमान ४८ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढले, तर या शतकाच्या अखेरीस हे तापमान ५५ किंवा ५६ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. परंतु येथे सरासरी तापमानाचा मुद्दा आहे. यानुसार जगातील ३० टक्के लोकसंख्येला उच्च तापमानात राहावे लागेल.

सहारा वाळवंटात उन्हाळ्यात ५५ किंवा ५६ डिग्री तापमान सामान्य आहे. या शतकाच्या अखेरीस जेव्हा पृथ्वीचे सरासरी तापमान ३ डिग्री सेल्सिअसने वाढेल, तेव्हा भारत, नायजेरिया, पाकिस्तानसह अनेक देशांतील नागरिकांना उष्णतेमुळे त्रास होईल.

टिम लेंटन यांनी सांगितले की, भारतातील सुमारे १२० कोटी लोकांना सहारा वाळवंटासारख्या उष्णतेत राहावे लागेल. नायजेरियाचे ४८.५ कोटी, पाकिस्तानचे १८.५ कोटी, इंडोनेशियाचे १४.६ कोटी, सुदानमध्ये १०.३ कोटी, नायजरमध्ये १० कोटी, फिलीपिन्समध्ये ९.९० कोटी, बांगलादेशात ९.८० कोटी, बुर्किना फासोमध्ये ६.४० कोटी आणि थायलंडमध्ये ६.२० कोटी इतके लोक उष्णतेत राहतील.

वेजनिंजेन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मार्टेन शेफर म्हणाले की, सरासरी २९ डिग्री से. तापमान असलेल्या ठिकाणी राहणे लोकांना अवघड आहे आणि भविष्यात देखील अवघड आहे. पण मानवाला त्यानुसार परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. आता समस्या ही आहे की एखादी व्यक्ती स्वतःला किती सावरेल. स्वत:ला सावरण्याची पण एक मर्यादा आहे.

प्रो. मार्टेन शेफर म्हणाले की, येत्या ५० वर्षांत मानवाला पृथ्वीवर आणि तिच्या वातावरणात असे बरेच बदल पहायला मिळतील, जे गेल्या ६००० वर्षांत पाहिले नाहीत. जगातील देशांनी प्रदूषण कमी केले पाहिजे. नाहीतर त्याद्वारे होणाऱ्या नुकसानीचा सर्वात जास्त परिणाम मानवावर होईल.